आंबा ह्या फळाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत एक अनोखे स्थान आहे. जशी महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती ही आमरस, कैरीचे लोणचे ह्यांचा समावेश केल्याशिवाय अपुरी वाटेल त्याच प्रमाणे मराठी अलंकारामध्ये आंब्याला वा कैरीला स्थान मिळाले आहे ते कोयरीच्या रुपात. आंब्याच्या कोयीच्या आकारापासून प्रेरणा घेऊन ' कोयरी ' हा आकारबंध बनतो. रांगोळी, मेहंदीमध्ये पण नाजूक कोयरी डिझाईन खुलून दिसते. त्याचप्रमाणे कोयरीच्या आकृतींनी सजलेले हे कोयरी तोडे कोणत्याही सुंदर स्त्रीच्या हाताचे सुंदर आभूषण ठरतात.
Specifications
- 92.5% Pure Silver with Antique Polish